प्रत्येक 'स्त्री' ने वेळ काढून वाचावा असा लेख
पाऊस येतोय म्हणून तो थांबेपर्यंत शाळेत थांबण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही.. कारण मी पाऊस येतोय म्हणून कधी थांबलेच नाही.. उलट पाऊस थांबायच्या आत आपण घरी निघायला हवं अशाच प्रयत्नात मी असायचे.. कारण माहित होतं की असं पावसात भिजून घरी गेलं म्हणजे मस्त गरम गरम ओवा अन मोहरीच्या तेलाची गेल्या गेल्या मालिश मिळणार.... आणि ती ही न चुकता,प्रत्येक वेळी..मिळतच असे.... भिजु नको, असं सांगीतलेलं असताना जरी भिजले तरी.. बोलणे बसायचे ... अन त्या सोबत हे तेलही हजर असायचं..
नंतर जेव्हा घरापासून लांब राहू लागले तसतसं पावसात भिजणंही हळूहळू कमी होत होत बंदच झालं.असं नव्हतं की जीवनात, आजुबाजुला माणसं नव्हती...पण तेव्हा कोणाच्याच हे लक्षात हे कधीच नाही आलं की पावसात भिजलेल्या मुलीच्या तळपायांना छान कोमट कोमट मोहरीच्या तेलानं मालिश करावं..कधीच नाही....
अशा शेकडो -हजारो गोष्टी आहेत, की ज्या आई नेहमी करायची, पण आईपासून लांब गेल्यावर कोणीच नाही केल्या...
त्यानंतर कोणी कधी डोक्याला तेल लावून मालिश नाही करुन दिलं.आज एखादा दिवस जरी आईकडे गेलं तरी आई डोक्याला तेल लावून मालिश जरुर करुन देते....
लहानपणी स्वयंपाक आवडीचा नसेल तर आई दहा ऑप्शन द्यायची..गुळतूप पोळी खा,मेतकुट भात खा,थालीपीठ करुन देऊ का? दही साखर पोळी खातेस का,शिकरण पोळी देते...असे एक ना अनेक....आई असे शेकडो नखरे सहन करायची.....आणि तरी भांडण पण तिच्याशीच व्हायचं..
पण नंतर कोणी तिच्याइतके लाड नाही केले....मी पण मग हळूहळू सगळ्या भाज्या खायला लागले...
माझ्या आयुष्यात आई एकच आहे.... परत नंतर कोणीच आईसारखी नाही आली.... मी मात्र मोठी होऊन आई झाले.... मुली होतातच नं आई आपोआप.....
प्रियकर,नवरा --कधी कधी छोटं मुल होतात..कधीकधी त्याच्यावर आपण खुप खुप प्रेम करतो... आपल्या ते लक्षातही येत नाही.... त्यांच्या डोक्याला मस्त गरम तेलाने मालिश होते, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतात.... त्यांचे सगळे नखरे आपण नकळत सहन करायला.. पुरवायला लागतो.. स्वतःला विसरून...
मुलांच्या... पेक्षा पुरुषांच्या जीवनात अनेक रुपात आई येते.. बहिण पण आई होते, बायको तर आई असतेच... काही काळानंतर मुलीही बाबांची आई बनतात.. पण.... पण..... मुलींजवळ फक्त एकच आई असते... मोठं झाल्यावर त्यांना आई नाही मिळत.. ते प्रेम, ते नखरे,तो हट्टीपणा आईशिवाय कोणीच नाही सहन करत.. आई परत फिरुन कधीच येत नाही....
मुलींच्या जीवनात आई फक्त आणि फक्त एकदाच येते..
Written by Anonymous
(Facebook contribution)

No comments:
Post a Comment