Monday, September 23, 2019

का असावे गेट टुगेदर ?

अकोल्याच्या ९० वर्षांवरील डाॅ नानासाहेब चौधरी यांच्या WhatsApp ग्रूपवरून फाॅरवर्ड केलेला हा संदेश आहे.*

त्यांनी काय म्हटले आहे त्यातील १०% जरी मला जमले तरी मी आनंदाने उड्या मारायला लागेन:

—————————————-

का असावे गेट टुगेदर ?            

" गेट टूगेदर चे महत्त्व"

● वरचेवर मित्रांच्या,
मैत्रीच्या संपर्कात
जरूर रहा
मनसोक्त पैसे
वेळ खर्च करा

●  आयुष्य
मर्यादित आहे
आणि जीवनाचा
जेंव्हा
शेवट होईल
तेंव्हा
इथली कोणतीच
गोष्ट आपल्या
सोबत
नेता येणार नाही .!

● मग जीवनात
खुप काटकसर
कशासाठी
करायची ?
आवश्यक आहे
तो खर्च केलाच
पाहिजे ज्या
गोष्टींतुन आपणास
आनंद मिळतो
त्या गोष्टी
केल्याच पाहिजेत .

●  आपण गेल्यानंतर
पुढे काय होणार
याची मुळीच
चिंता करु नका .
कारण आपला
देह जेंव्हा
मातीत मिसळून
जाईल तेंव्हा
कुणी आपले
कौतुक केले काय
किंवा टीका
केली काय ?  
   
●  जीवनाचा आणि
स्वकष्टाने मिळवलेल्या
पैशांचा आनंद
घेण्याची वेळ
निघून गेलेली
असेल ...!

●  तुमच्या मुलांची
खुप काळजी
करु नका . त्यांना
स्वत:चा मार्ग
निवडू द्या .
स्वतःचे भविष्य
घडवू द्या .
त्यांच्या ईच्छा
आकांक्षाचे
आणि स्वप्नांचे
तुम्ही गुलाम
होऊ नका .

 ●  मुलांवर प्रेम करा
त्यांची काळजी
घ्या, त्यांना
भेटवस्तुही द्या.
मात्र काही खर्च
स्वतःवर
स्वतःच्या
आवडी
निवडीवर करा .

●  जन्मापासून
मृत्युपर्यंत
नुसते राबराब
राबणे म्हणजे
आयुष्य नाही
हे देखील
लक्षात ठेवा .

 ●  तुम्ही
पन्नांशीत आहात
आरोग्याची
हेळसांड करुन
पैसे कमवण्याचे
दिवस आता
संपले आहेत .
पुढील काळात
पैसे मोजून सुद्धा
चांगले आरोग्य
मिळणार नाही .

●  या वयात
प्रत्येकापुढे
दोन महत्त्वाचे
प्रश्न असतात .
पैसा कमवणे
कधी थांबवायचे
आणि किती पैसा
आपल्याला पुरेल!

 ●  तुमच्याकडे
शेकडो हजारो
एकर सुपीक
शेतजमीन असली
तरी तुम्हाला
दररोज किती
अन्नधान्य लागते ?
तुमच्याकडे
अनेक घरे असली
तरी रात्री
झोपण्यासाठी
एक खोली
पुरेशी असते !

●  एक दिवस
आनंदा शिवाय
गेला तर
आयुष्यातला
एक दिवस तुम्ही
गमावला आहात
एक दिवस
आनंदात गेला तर
आयुष्यातला
एक दिवस तुम्ही
कमावला आहात
हे लक्षात असू द्या.

●   आणखी एक
गोष्ट तुमचा
स्वभाव खेळकर
उमदा असेल
तर तुम्ही
आजारातून
बरे व्हाल आणि
तुम्ही कायम
प्रफुल्लीत असाल
तर तुम्ही आजारी
पडणारच नाहीत .

●   सगळ्यात
महत्वाचे
म्हणजे
आजूबाजूला
जे जे उत्तम आहे
उदात्त आहे
त्याकडे पहा .
त्याची
जपणूक करा

●  आणि हो, तुमच्या
मित्रांना/मैत्रीणींना
कधीही
विसरु नका
त्यांना जपा .
हे जर तुम्हाला
जमले तर तुम्ही
मनाने कायम
तरुण रहाल
आणि इतरांनाही
हवेहवेसे वाटाल.

●  मित्र-मैत्रीण
नसतील तर
तुम्ही नक्कीच
एकटे आणि
एकाकी पडाल.

●   त्यासाठी रोज
व्हाट्सएपच्या
माध्यमातून
संपर्कात रहा
हसा, हसवत रहा
मुक्त दाद द्या
म्हणूनच म्हणतो
आयुष्य खुप
कमी आहे ते
आनंदाने जगा ...

●  प्रेम
मधुर आहे
त्याची
चव चाखा..!

●  क्रोध
घातक आहे
त्याला
गाडुन टाका..!

● संकटे ही
क्षणभंगुर
आहेत
त्यांचा
सामना करा..!

●  डोंगरा आड
गेलेला सूर्य
परत दिसू शकतो
पण ....

●  माथ्या आड
गेलेले "जिवलग"
परत कधीच
दिसत नाहीत ....

!! मित्र जपा
मैत्री जपा!!

*जमेल तसं जमतील तेव्हडे मात्र गेट टूगेदर करीत रहा!*
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

Tuesday, July 30, 2019

आईची तिजोरी

*आईची तिजोरी...!*

अण्णांचा पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम अण्णा आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त्यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शीलकी रहायची ती आई बचत करून ठेवायची...

घरात एक गोदरेज कपाट सार्वजनिक...! आई अण्णा.. आम्ही पाच भावंडे असे सगळे मिळुन सात जणांमध्ये ते बिचारं तीन बाय सहाच गोदरेजचं लोखंडी कपाट स्वतःहून समर्पित झालेलं असायचं आम्हाला... शिवाय काचही फुटलेली त्याची...! गेल्या 25 वर्षात त्याला परत काच लागली नाही...!

तो काळ ही तसाच होता... अण्णा शिक्षक... त्याकाळी पगार कितकासा राहणार? आजच्यासारखं वेतन आयोगामध्ये लोळणारे शिक्षक नव्हते ते! हल्लीचे शिक्षक गाड्या बंगल्याचे हप्ते भरतात! त्यावेळी समाजातला आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा होता शिक्षकी..!

घरखर्च, पाच जणांचं शिक्षण, कपडे, वह्या पुस्तकं, आजारपण ह्यातच त्यांची महिनाअखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची... झाकलेल्या पाटीसारखी अवस्था... एक कोंबडं झाकावं तर दुसरं आरवायचं! अशावेळी आईची मदत व्हायची...

म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते. घरात धनधान्याला बरकतता असते. अण्णांचा पगार वाटुन संपलेला असायचा तेंव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा; साचवलेल्या बचतीतून...!

कुणाचा हात पोहोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये  म्हणून घरातल्या घरात साचवून ठेवायची ती वेगवेगळ्या क्लुप्त्या करून...! आणि पैशांकडे हात आपोआप आकर्षित होत असणारा मी... नकळत डबोल मिळायचं मला तिचं.... _'कुणाला सांगणार नाही'_ म्हणून किरकोळ कमिशन घ्यायचो मी..! पण ते सर्व ती घरासाठीच करते हे त्या बाल-किशोर-तरुण वयातही समजायचं...!

एकदा टेपरेकॉर्डर चा external speaker box टराटरा आवाज काढायला लागला... कालपर्यंत चांगला वाजणारा बॉक्स असा काय वाजतोय म्हणुन वर चढून काढला दुरुस्तीला... घरातल्या घरात दुरुस्तीचे उपाय म्हणुन घेतला उघडायला... मागे कव्हरला वरून बोटभर गॅप होता त्याला...

चारही कोपऱ्यातले स्क्रू काढल्यावर कव्हर अलगद काढले नि आत मध्ये प्लॅस्टिक हिरव्या पिशवीत कसलीशी पुरचुंडी दिसली... गुंडाळलेली...!

पिशवी उघडली... त्यात शंभर... पन्नास... वीस... दहाच्या नोटा एकमेकांत गुंडाळुन मस्त आराम करत होत्या...! हजार पंधराशे सहज असतील... अल्लाउद्दीनचा खजाना लागला जसा हातात...!

आई बघत होती... म्हटली, _"आण इकडे...!"_ पन्नास रुपये कमिशन वर दिले परत अण्णांना न सांगण्याच्या बोलीवर...! नंतर त्याच पैशाचा घरातला पहिला सिलिंग दिल्ली मेड फॅन फिटिंग चार्ज सहित तीने बसवला... त्याआधी मुंडी इकडून तिकडं हलवणारा टेबलफॅन च असायचा..!

चाळीतलं घर म्हणजे एकेकाळी विडीउद्योगाचं ऑफिस होतं... स्वयंपाक घरात एका बाजूला कप्पेच कप्पे; एका वर एक कौलापर्यंत एकमेकांच्या बाजूला... भिंतीत बनवलेले... भिंतच जवळ जवळ दीड फूट जाडीची...!

जवळ जवळ वीसपंचविस कप्पे असतील...! स्वयंपाक घरातील सगळ्या वस्तू सहज बसायच्या त्यात... त्यातल्या एका वरच्या कप्यात सहा सात फुटावर पाहुणा गणपती ठेवलेला असायचा... म्हणजे गणपती वर्षभर जपून ठेवायचा..  पुढल्या गणपती सोबत बसवायचा आणि मागच्या वर्षाचा गणपती मग विसर्जित करून नवीन आणलेला गणपती पुढं वर्षभर ठेवायचा...! प्रथाच आहे ती घरातली...!

बोटांना परत वळवळ आली... म्हटलं धूळ साचलीय तर पुसून घ्यावा... वर चढलो... काढला तो गणपती... साफ करायला फडकं घेतलं... प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा खालून पोकळ असलेला गणपती तो... उलटा केला तर परत प्लॅस्टिकची पुरचुंडी...!

देवानं दान दिलं परत...! आईनं धपाटा टाकला... म्हटली _"कुठं कुठं हात पोहोचतात तुझे...!"_ कमिशन बेसिस वर परत मिळाले तीला...! पुढे डमरू सारखा नवीन टेपरेकॉर्डर घ्यायला तिनेच ते पैसे दिले होते..!

पुढे कधी कपाटाच्या पायांच्या खाचेत, ड्रॉवरच्या बाजूच्या जागेत... असे किती तरी वेळी सापडले...! कितीतरी वेळी तिने साचवलेल्या पैशातून घरच्या गरजा पूर्ण केल्या; जशा जमतील तशा...!

ना स्वतःसाठी काही दागिना केल्याचं आठवत, ना कधी साड्या. मेकप तर कधी आठवतही नाही तिनं केल्याचं!
साधी पावडर काय ती तेवढं लावतांना दिसायची... साधी, भोळी, भाबडी... साधं आयुष्य...!

वडिलांची मिळकत जेवढी त्यावर गुजराण करत जपलं सारं... हट्ट नाही की हेका नाही... परिस्थितीशी समझोता...

वडील रिटायर्ड झाल्यावर वडिलांनी हौसेनं केलेल्या बांगड्या बहिणीच्या लग्नात सरळ मोडायला देऊन टाकल्या...!

मुलगा झाला त्यावेळी मला अकरा हजार साचवलेले घेऊन आली द्यायला...!

वडील अंथरूणाला खिळले तेंव्हाही त्यांच्या दर महिन्याला काढलेल्या आणि साचवलेल्या पेन्शन मधूनच त्यांचे औषधपाणी, दवाखाना झाला... माझी मदत म्हणून किरकोळ..!

वडील गेले तेंव्हाही रितिरिवाजाप्रमाणे जेंव्हा घरातील डबे धुवायला घेतले... तेंव्हाही किती तरी डब्यात हजार पंधराशे सापडले पुरचुंड्या करून त्यावर आकडा लिहून ठेवलेल्या...!

तिला विचारलं तर भोळ्या मनानं म्हटली _"मलाच नाही माहीत...!"_

व्यावहारिक नव्हतीच ती कधी... अन जमलं ही नाही तिला कधी...! स्वतः ऍडमिट झाली तेंव्हाही तिचीच बचत कामी आली दवाखान्यासाठी... तिच्या उत्तर कार्यासाठी...! झळ नाही देऊन गेली जातांनाही...!

_'आई..._

_तुझ्या बचतीतले पैसे तुझ्या दवाखान्यासाठी खर्च होऊन शेवटचे उरलेलेे नऊशे रुपये तसेच ठेवलेत ग डब्यात तुझ्या...! दहा रुपयाचे खूप सारे कॉइनही तसेच राहू दिलेत लक्ष्मीपूजनाचे...! एका लक्ष्मीची एका गृहलक्ष्मीने केलेली पूजा खरच भोळी असायची...! श्रद्धा खूप तुझी... देवानं दिलंही सढळ सारं...! खूप हौशीने साजरी करायचीस तू लक्ष्मीपुजन...! डब्याला कुलुपही तसंच आहे... तू शिसपेन्सिलने लिहिलेले हिशोबाचे कागदही तसेच ठेवलेत तुझ्या डब्यात...! कमिशन नकोय ग मला...!'_

अक्काचा एक मित्र किरण खैरनार बोलता बोलता खखूप छान सांगून गेला; दारी आला होता तर... _"लिहा तुमच्या आठवणी लिहा... लिहिलं नाही तर पुढच्या पिढीला कसं समजणार की तुम्ही काय आणि कोण होतात ते...? कळू द्या पुढच्या पिढीला... वाचनाने जितकं समजतं तितकं सांगुन कमीच... म्हणून लिहा... कडू, गोड... लिहिण्यात चित्र उभं करा..."_

छान सुचवून गेला तो...!

आई, तू आजही हे लिहिताना
तू तशीच उभी राहिलीस समोर...!

Monday, July 8, 2019

निरागस बालपण

🍁  आम्ही ती शेवटची पिढी आहोत , मातीच्या घरात जन्मलो...

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,... वीज नसताना दिव्याच्या प्रकाशात वहीची पानं खट क्याच्या पेनांन गिरवली....

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,...शाळेतून वायरी च्या दप्तराच ओझ कोपऱ्यात टाकून शिळी भाकरी ,तेल चटणी खाल्ली..

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...मे च्या सुट्टीत रखरखत्या उन्हात  रानमेव्याचा आस्वाद घेत विहिरी पालथ्या घातल्या...

🍁 आम्ही ती शेवटची पिढी आहोत..ज्यांनी पावसाळ्यात छत्री, रेनकोट ऐवजी पोत्याची खोप घेतली.

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,..उन्हाळ्यात पळसाचं चप्पल,पावसाळ्यात चिखलाची जाड चप्पल. मिरवत निसर्गाचा आनंद लुटला..

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत...पावसाळ्यात थंडीचा पाऊस पडताना  आजीच्या उबदार गोधडीत वाघाच्या ,भुताच्या गोष्टी ऐकल्या...

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...गल्ली बोळात लपाछपी खेळतोय..

  🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...गोटि चा खेळ , MRF च बॅट नसताना बांबूच्या दांडक्याने क्रिकेट खेळलो...

🍁 आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,... Led- LCD , mobile नसताना सेल वरच्या रेडिओचा आनंद घेतला.

🍁आम्ही ती शेवटची  पिढी आहोत ,..जेव्हा सुझुकी, बुलेट.नव्हती ,
तर एक रुपयाला तासभर फिरणारी  भाड्याची सिंगल सीट सायकल होती..

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...कॉइन बॉक्सवर 1रुपयात आपुलकीचं बोलण व्हायचं..

😔 कुठे तरी हरवलं ते व्यवहाराचा आणि भौतिकतेचा स्पर्श नसलेलं *निरागस बालपण* ..

🙏 आपल्या चिमुकल्यांना या भौतिक आणि यांत्रिक जगातून बाहेर खेचून आपल्या *पिढीने अनुभवलेले* ते *क्षण*  जरा कथन  करा .  क्षणभंगुर का होईना गतकाळात जायला मिळेल..
                      

Tuesday, June 18, 2019

गरुड की पोल्ट्रीची कोंबडी....?

*मुलांना काय घडवताय...?*
*गरुड की पोल्ट्रीची कोंबडी....?*
   
*माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले.....!*
मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले.
  पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला....!
एक दोन व्यवसायात अपयश आलेले,नोकरीतही तग धरत नाही
महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही.
 
*का झाले असावे असे.....?*
मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला...!
   *जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.....!*
   बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात,शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात.....!
   पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते,
  त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोआराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात.
   ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात,ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात,
   *पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात;*
   असे का,याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे....!
 
 *तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे....!*
   
*गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू,स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे,*
    *तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.*
 
आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात....!
पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३०/३५ हजारात गेला.मुलांना कॉन्व्हेंट शाळा,सकाळी बिस्किट,मॅगी,केक,स्कूल बस,घरी परत आल्यावर हातात जेवण,
पुस्तके व गाईड्स,क्लासेस,पॅरेंट मीटिंग,लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती,पालकही अभ्यास घेतात,मुलांना वार्षिक सहल,गृहपाठ,प्रोजेक्ट,
अजून बरंच काही.

मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात,
   
जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो,त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो.कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते.विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो.
     *तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते....!*
 
 आपला मुलगा म्हणजे खूप हुशार,हिरो,मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा,प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात.
   *परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो....!*

मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो,तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते.
१० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही.
उद्योग व व्यवसाय करावा,तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.
   
पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो.
   
*काय चुकले असेल या पालकांचे....?*
    *एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर मग मुलं अपयशी का....?*
    पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल घेवुन दिला,
त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला,

पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का...?.
 
कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली,
पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने,वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का...?
   
 जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते,
रोज समोर खाद्य टाकले जाते,पण त्या कोंबडीला हे माहित नसते,की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते,
ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे...! लागते,चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते.
ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही...!
    *याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत....!*
   *लहानपणी शाळेची पुस्तके जुनी,फाटलेली,मित्रांची किंवा भावाची वापरली.शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती,शाळेत जायला साधी सायकलही नव्हती.*
   *पाटी,दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे.जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची.*
    *आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची.*
   *केक,मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा..!*
   *गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे,नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची......!*
    *कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक.एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा,झाडाचा डिंक काढायचा,बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा.....!*
    *आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात....!*,
*ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?*
    *कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे....!*

शिकण्याची इच्छा असते,
इंजिनिअर व्हावे,
पुण्याला जावे,
मुंबईला जावे,
परदेशात जावे,

पण वडिलांनी साफ सांगितले,
आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही.

*आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका.१२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस,थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा...!*
    *अशी मुलं पुढे होतात गरुड...!*

 कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत.

ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते.
ज्यांना पालकांकडून फटक्यात पैसे मिळतात,
तो डोकं चालवायची तसदीच का घेईल?
शाळेत असताना ज्यांना घरची शेती,घरकाम,दुकानातील काम करावे लागते,त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते.गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते.

व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते.१२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात.

*अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात,त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते.*

*ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात.गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही,ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात...!*
 
*जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात....!*
 
 *पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो.*
  *जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते....!*

*तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात....!*
  *पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की...!*
 
*पोल्ट्रीची कोंबडी..?*
    *महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा....!*

Friday, March 22, 2019

30 ओलांडली, आता साठी

1981/1982/1983/1984/1985/1986/1987/1988/1990

ही पीढ़ी आता 30ओलाडून 40 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....

१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, सराईतपणे हाताळत आहे*.

ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....

टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.

मार्कशीट आणि टिव्ही च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला  नव्हता.

'सळई जमिनीत रूतवत जाणं' हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.

'कैऱ्या तोडणं' ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं या मध्ये कसलेही एथीक्स तुटत नव्हते.

मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.

वर्गात किवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी ही पिढी.

दोन दिवस जरी मित्र
शाळेत नाही आला तर
 शाळा सुटल्या सुटल्या
दप्तरासकट
त्याच्या घरापर्यंत जाणारी
ती पीढी..

कुणाचेही बाबा शाळेत
आले की..मित्र कुठेही
खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने "तुझे बाबा आलेय चल लवकर "
ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी

पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.

कपील, सुनिल गावसकर  , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते  राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख  माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी

भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.

लक्ष्या-अशोक च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली, हे कलाकार पाहिलेली पिढी.

कितीही शिकलं तरी 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' यावर विश्वास असणारी

'शिक्षकांचा मार खाणं' यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण 'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी.

ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी.

वर्गात कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी.    
    कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...

ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी.

पंकज उधासच्या 'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया' या ओळीला डोळे पुसणारी,

दिवाळीच्या पाच दिवसांची कथा माहित असणारी

लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.

पुन्हा डोळे झाकुया ?

दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण  आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार  असं  मानणारी ही पिढी ?

धन्य ते जीवन जे खर आपणच  जगलोय !!!🌹