Sunday, May 10, 2020

लायकी दाखविण्याचे दिवस…



लायकी दाखविण्याचे दिवस

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो.

इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला, *दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?*
दादानं तोंड वाकडं करत, *समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पे.
असा सल्ला दिला.
एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?
दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं.
तसा तो पोऱ्या म्हणाला, *पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तिबी संपली. म्हणून म्हणालो.

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, वाह रे वाह शहाणा? म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना आसलं तर तो आम्हाला देऊन जाणार.
ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं.

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्या गैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात, अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्चविद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली.
उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या.
असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला.
आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, *त्यांच्याकडं कामालाहे कारे तू भैय्या?
पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर  ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला, वडील होते माझे.

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी इतकं हिंडतोय व्हय?
गवार तोलत भैय्या म्हणाला, घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबीहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळेहेत. पण तात्या म्हणत्यात आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्सहे. आत्ताच्या काळात गरीबाबरं लोक जेवढं वाईट वागत्यात तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.

त्याचं वाक्‍य संपलं, तशे पटापट त्याच्या हातावर पैशे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होतो.
आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता.

Friday, May 1, 2020

Corona,Carona ,Karona

Hi Friends,

It was at mid night i woke up thinking i had to notedown something. Everytime something amazing comes when i am about to sleep or during the pressure in the washroom .

Few things i remembered on my bed the old memories of  Brand corona/carona which was not new.
Now There is corona pandemic and fearful with its epithet as Covid-19

1) Carona is the brand of Mumbai (INDIA) with school shoes during 80's. Carona shoes once had the existence at Jogeshwari in mumbai (INDIA). I am sure each and every student of  80's and 90's had atleast once bought corona brand school shoes.

2)Corona cocoa drink of Egypt . I had bought from the Carrefour city centre at Deira. as a substitute to coffee.
Corona Egypt has many products with chocolates wafers jelly under the parent company corona from Alexandria Egypt.u can get this in branded supermalls.

3)Corona from Europe from south wales has Tango ,If u had  “Livva little hot,Sippa GoldSpot” u will love Tango it"s somewhat similar taste. In European nation Tango is seen  everywhere loved more because it has orange in taste and colour.

4)Corona Beer a spanish people brand from Maxico in North America. it's colour of bottle and beer is sunny yellow colour. oxidize it, letting light in that causes beer to lose hop flavor as well as produce off flavors.

I was just wondering “Could one imagine walking into a bar and saying, ‘Hey, can I have a Corona?’ or ‘pass me a Corona?’"

This pandemic impacted on the sales of this brand name corona.

I have been pondering as to whether the global outbreak has damaged the brand’s image.

India have one more  Linguistic word Karona (To Do) in Hindi .


बालाश्रम

                     बालाश्रम

(शहरामध्ये उद्भवत असलेल्या एका समस्येवर प्रकाश टाकणारी कथा)

नरेशने काका-काकू, मामा-मामी आणि बहिण नंदा यांना मेसेज पाठवला "मी आई-बाबांना वृद्धाश्रमात ठेवले".

नरेश - आई-बाबा, नंदा आणि सर्व नातेवाईकांच्या मते वाया गेलेला मुलगा. त्याच्या उनाड मित्रांबरोबर भटकणारा, कधी-कधी सिगारेट, दारू घेणारा, एकूणच  बिघडलेला. कोणीही त्याच्याशी बोलत नव्हते, अगदी आई-बाबाही कामापुरतेच!

नरेशने तीन वर्षांपूर्वी सुरेखाबरोबर रजिस्टर पद्धतीने प्रेमविवाह केला. सर्वांना मेसेज पाठवला होता. कोणी येण्याची शक्यता नव्हतीच. आई-बाबाही नाईलाजाने उपस्थित होते. गेल्या वर्षी त्यांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. फोन कोणीही घेणार नाही हे माहीत असल्याने मुलाच्या बारशाला त्याने सर्वांना मेसेज पाठवला. कोणीही आले नाही. 
     म्हणून त्याने आज आई-बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्याचा मेसेजच पाठवला. 

 दोन दिवसांनी एकापाठोपाठ काका, मामा व नंदा यांचे मेसेज आले "आम्ही रविवारी येतोय". नरेश मनाशी हसला. चला, तयारीला लागूया.

 रविवारी संध्याकाळी काका-काकू, मामा-मामी आणि नंदा एकत्रच आले. नरेश मनाशीच म्हणाला, म्हणजे हे सर्व एकमेकांशी बोलून, ठरवूनचं आलेत तर. हेही बरे झाले.

 सुरेखाने सर्वांना पाणी दिले. पाणी पिता-पिता नंदाने घरावर नजर फिरवली. हॉल छोटा असूनही वहिनीनं चांगलाच सजवलाय. हं, घरीच असते म्हणून.
     तेवढ्यात काकांनी विषयाला हात घातला, "अरे, तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. ज्यांनी तुला कष्ट करून लहानाचं मोठं केलं   त्यांना तू वृद्धाश्रमात ठेवलस." एवढे बोलेपर्यंत त्यांचा चेहरा लाल झाला.
     मामांनी री ओढली, "उतारवयात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, ते सोडून तू आई-बाबांना वृद्धाश्रमात टाकलस. अरे, या वयात त्यांना प्रेमाची, मुलांची गरज असते."
     नंदाने आपला राग बाहेर काढला, "एवढं होतं तर वहिनीला नोकरीला पाठवना, चांगली शिकलेली, कॉम्पुटर प्रोगामर आहे की."
    बहुतेक सर्वांच बोलून झाले होते. नरेशने सुरुवात केली.
     "माझ्या जन्माच्या आधीपासून आई-बाबा नोकरी करतायत.  साधारण एक वर्षाचा असल्यापासून मला पाळणाघरात ठेवायला लागले. माझ्या संमतीचा प्रश्नच नव्हता. पुढे मला जसं थोडं समजायला लागलं तसं मला नेहमी आई जवळ असावी, आई बरोबरच रहावं ही इच्छा मनात घर करून राहिली आणि दिवसेंदिवस ती प्रबळ होत गेली. सकाळी बाबा शाळेत सोडायचे, तिथून बसने पाळणाघरात आणि रात्री घरी असं माझं बालपण गेलं. शाळेत माझ्या काही मित्रांना त्यांची आई घ्यायला यायची. किती आनंदाने ते जाऊन आईला बिलगत होते! ते पाहून मला त्यांचा खूप हेवा वाटायचा. मला जे सुख मिळत नाही ते त्यांना मिळताना बघून पुढे-पुढे मला त्यांचा राग यायला लागला. 
    काका, लहानाचा मोठा मी पाळणाघरात झालो. फक्त झोपण्यापूर्त मला घरी आणलं जायचं. मी आईचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडत होतो पण माझ्या वाट्याला ते आलचं नाही.
    मला नेहमी वाटायचं आईने मला जवळ घेऊन बसावं, तिच्या मांडीवर बसून मी खेळाव, तीने माझ्याबरोबर खूप हसावं, खेळावं. पण आईला "वेळ" नव्हता. ज्या वयात मला काहिही समजतं नव्हतं, आई-बाबा हेच माझं विश्व होतं, आई-वडिलांची मला गरज होती, त्या वयात मला पाळणाघरात ठेवलं गेलं. काय फरक आहे हो पाळणाघरात नि वृद्धाश्रमात? तुम्ही त्याला कितीही गोंडस नाव दिलत, पाळणाघर, बेबी-सिटर वा आणखी काहीही, तरी माझ्या दृष्टीने तो "बालाश्रम"च आहे. जसा वृ�द्धाश्रम तसाच हा बालाश्रम. माझ्या भावनाही मला व्यक्त करत्या येत नव्हत्या अशा वयात मला आई-वडिलांची, त्यांच्या आधाराची जास्त गरज होती, त्यावेळी मला त्या बालाश्रमात डांबलं  गेलं. त्यावेळी तुम्ही कोणी आला नाहीत बोलायला."
     सगळेजण गप्प होते. नरेश पुढे म्हणाला, "मला जसं समजायला लागलं तस मी घरी आल्यावर आईने मला भरवाव म्हणून हट्ट करू लागलो की जेणेकरुन आई मला जवळ घेऊन मांडीवर बसवून भरवेल. पण उलट मला मार मिळायचा. आईला तिची कामं असायची. मलाच हाताने खायला लावायचे. एकदा मी आजारी पडलो, ताप होता. त्यावेळी आईने सुट्टी घेतली, मला खूप आनंद झाला. आता दिवसभर आई आपल्याला मिळेल. पण छे, फक्त औषध देण्यापुरत ती माझ्याजवळ आली नंतर घरातली राहिलेली कामं करायला गेली. मला खूप राग आला पण एक समजलं, आजारी पडलं की आई सुट्टी घेते. मग मी मुद्दाम आजारी पडायला लागलो. पण सुट्टी घेउनही आई वा बाबा माझ्या वाट्याला जास्त आलेच नाहीत. ते त्यांच्या कामातच मग्न, कधी घरची तर कधी ऑफिसमधून आणलेली. माझी आई-प्रेमाची भूक दिवसेंदिवस वाढतच होती आणि त्यातूनच माझं अभ्यासातील लक्ष कमी होऊ लागलं. 
     मार्क कमी पडू लागले आणि मला वाटलं आतातरी आई-बाबा माझ्या बरोबर बसून माझा अभ्यास घेतील. त्याऐवजी त्यांनी मला ट्यूशन लावली. आतातर आई-बाबांचा सहवास फक्त रात्री जेवणापुरताच मिळू लागला. आई-बाबांचं लक्ष आपल्याकडे कसे वेधता येईल याभोवतीच माझं लक्ष केंद्रित होऊ लागलं. एके दिवशी रस्त्यात पडलेला सिगारेटचा तुकडा मी उचलून डब्याच्या पिशवीत ठेवला. रात्री आईने तो पाहिला, मला वाटलं आता तरी दोघेही मला जवळ घेऊन माझ्याशी बोलतील आणि मग मी त्यांना खरं ते सांगेन. मला मिळाला फक्त मार आणि सज्जड दम. त्यावेळी मला समजलं आई-बाबा यांच्या विश्वात मला स्थान नाही आणि ज्या प्रेमासाठी माझं मन आसुसल आहे ते मला मिळणार नाही. त्यांची बोलणी आणि मार नेहमीचा झाला आणि मी कोडगा बनत गेलो. 
     थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. काकू प्रथमच बोलल्या, "अरे, त्यांच्या भावनांचा तरी विचार करायचास, त्यांना काय वाटलं असेल आणि समाज काय म्हणेल याचा तरी विचार कर".
    नरेश उसळून म्हणाला, "वृद्धाश्रमातील वृद्धांच्या भावना तुम्हाला दिसतात पण ज्या बछड्यांना नीट बोलताही येत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत, त्यांना भावना नाहीत? वृद्धांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसतात आणि त्या कोवळ्या लहानग्यांच्या डोळ्यातून वाहणारे पाट तुम्हाला दिसत नाहीत? आईसाठी ते रडले तर त्यांना मारून, आमिष दाखवून बालाश्रमात डांबतात आणि समाज गप्प रहातोय, वा रे समाज !
     काका समजावणीच्या सुरात म्हणाले, "अरे, दोघांनी नोकरी करणं गरजेचं होतं. त्यामुळे पाळणाघरात ठेवणं गरजेचं होतं."
     नरेश उत्तरला, "त्यावेळी त्यांना गरज होती म्हणून त्यांनी मला बालाश्रमात ठेवलं, आज माझी गरज आहे म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं".
     काही काळ निरव शांततेत गेला. नरेशने सुरेखाला काही खूण केली, त्याबरोबर तिने जाऊन बेडरूमच्या दरवाज्याची कडी काढली आणि . . . 
     . . . आणि हुंदके देत आई बाहेर आली आणि नरेशचं मस्तक छातीशी धरुन त्याचे पटापट मुके घेऊ लागली. या अनपेक्षित झालेल्या वात्सल्याच्या वर्षावाने क्षणभर नरेश गोंधळला, अखेर त्याचाही बांध कोसळला आणि दोघांच्याही डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा आणि यमुनेचा संगम होऊन त्या पुरात ते चिंब भिजले. त्या दोघांना वेगळं करण्याची हिम्मत कुणाकडेच नव्हती. बाबाही हळूच येऊन जमिनीकडे बघत सोफ्यावर बसले. एकच क्रिया ते सतत करत होते, डोळ्यांना रूमाल लावणे. थोड्यावेळाने नरेश भानावर आला आणि त्याने आईला हाताला धरून सोफ्यावर बसवले.
     नरेश म्हणाला, "नंदा, तू म्हणते सुरेखाला नोकरीला पाठव. मी जे भोगलं तेच आमच्या मुलाच्या वाट्याला आम्ही येऊ देणार नाही. संसारगाड्याची दोन चाके आहेत, एक अर्थार्जन आणि दुसरे घर. दोघांनीही नोकरी केली की रोज दोघांचीही धावपळ, कामाचा तणाव यात दोघांनाही ना मुलाकडे ना आई-बाबांकडे लक्ष देता येणार. त्यातून होणारी चिडचिड, नैराश्य यामुळे बिघडलेलं सर्वांच आणि पर्यायाने घराचं स्वास्थ. या सर्वांचा विचार करून लग्नाआधी आम्ही बोललो आणि ठरवलं की एकाने अर्थार्जन करायचे आणि एकाने संपूर्ण घर आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचे. आणि महत्वाचे म्हणजे मला माझ्या मुलाला बालाश्रमात ठेवायच नाहीये. आई-बाबा थकलेत आणि त्यांच्यावर मला मुलाची जबाबदारी सोपवायची नाही. आजपर्यंत ते इच्छा मारूनच जगले, आता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे राहू द्यायचय. आज संसाराच्या गाड्याच एक चाक, घर, सुरेखा पूर्णपणे सांभाळत असल्यानेच मी माझ्या कामात निर्धास्तपणे झोकून देऊन कामामध्ये नविन जबाबदाऱ्या घेऊन यशस्विरित्या पार पाडू शकलो. आणि त्यामुळेच गेल्या महिन्यात मला मार्केटींग मॅनेजर पदावर बढती मिळाली."
     नरेशने आतून पेढ्याचा बॉक्स आणला व स्वतःच्या हाताने आईला पेढा भरवला. नंतर बाबांच्याही खांद्यावर हात ठेवून त्यांनाही पेढा भरवला आणि मग सर्वांना पेढे दिले. 
     काका म्हणाले, "पण तू हे सर्व नाटक कशासाठी केलं".
     नरेश हसला आणि म्हणाला, "सुरेखा खूप दिवसांपासून म्हणत होती, एकदा सर्वांना बोलवून मनातील गैरसमज दूर करा आणि तुम्ही खरंच कसे आहात ते सर्वांना कळू द्या. मी बोलावलं असतं तर तुम्ही कुणीच आला नसता. म्हणून हे करावं लागलं".
     मामी म्हणाल्या, "खरंच तू आज आमचे डोळे उघडलेस आणि नरेश व्यसनी नसून एक जबाबदार मुलगा आहे हेही समजलं".
     नरेश हसत म्हणाला, "आजचा समाज हा स्वतःभोवती आणि पैशाभोवती केंद्रित झालाय, तो जर कुटुंबाभोवती केंद्रित झाला तर आजच्या समाजातले कित्येक प्रश्न आपोआप सुटतील. आणि मामी, मला व्यसन असं कधी नव्हतंच, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला तो एक प्रयत्न होता".
      नरेशने आईकडे पाहिलं, अजूनही ती हुंदके आणि उसासे यातून सावरली नव्हती. नरेश आईजवळ गेला आणि त्याने आपले हात आईच्या गळ्याभोवती गुंफले � आणि म्हणाला, "आज मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे, आज मला माझी आई मिळाली"

Monday, September 23, 2019

का असावे गेट टुगेदर ?

अकोल्याच्या ९० वर्षांवरील डाॅ नानासाहेब चौधरी यांच्या WhatsApp ग्रूपवरून फाॅरवर्ड केलेला हा संदेश आहे.*

त्यांनी काय म्हटले आहे त्यातील १०% जरी मला जमले तरी मी आनंदाने उड्या मारायला लागेन:

—————————————-

का असावे गेट टुगेदर ?            

" गेट टूगेदर चे महत्त्व"

● वरचेवर मित्रांच्या,
मैत्रीच्या संपर्कात
जरूर रहा
मनसोक्त पैसे
वेळ खर्च करा

●  आयुष्य
मर्यादित आहे
आणि जीवनाचा
जेंव्हा
शेवट होईल
तेंव्हा
इथली कोणतीच
गोष्ट आपल्या
सोबत
नेता येणार नाही .!

● मग जीवनात
खुप काटकसर
कशासाठी
करायची ?
आवश्यक आहे
तो खर्च केलाच
पाहिजे ज्या
गोष्टींतुन आपणास
आनंद मिळतो
त्या गोष्टी
केल्याच पाहिजेत .

●  आपण गेल्यानंतर
पुढे काय होणार
याची मुळीच
चिंता करु नका .
कारण आपला
देह जेंव्हा
मातीत मिसळून
जाईल तेंव्हा
कुणी आपले
कौतुक केले काय
किंवा टीका
केली काय ?  
   
●  जीवनाचा आणि
स्वकष्टाने मिळवलेल्या
पैशांचा आनंद
घेण्याची वेळ
निघून गेलेली
असेल ...!

●  तुमच्या मुलांची
खुप काळजी
करु नका . त्यांना
स्वत:चा मार्ग
निवडू द्या .
स्वतःचे भविष्य
घडवू द्या .
त्यांच्या ईच्छा
आकांक्षाचे
आणि स्वप्नांचे
तुम्ही गुलाम
होऊ नका .

 ●  मुलांवर प्रेम करा
त्यांची काळजी
घ्या, त्यांना
भेटवस्तुही द्या.
मात्र काही खर्च
स्वतःवर
स्वतःच्या
आवडी
निवडीवर करा .

●  जन्मापासून
मृत्युपर्यंत
नुसते राबराब
राबणे म्हणजे
आयुष्य नाही
हे देखील
लक्षात ठेवा .

 ●  तुम्ही
पन्नांशीत आहात
आरोग्याची
हेळसांड करुन
पैसे कमवण्याचे
दिवस आता
संपले आहेत .
पुढील काळात
पैसे मोजून सुद्धा
चांगले आरोग्य
मिळणार नाही .

●  या वयात
प्रत्येकापुढे
दोन महत्त्वाचे
प्रश्न असतात .
पैसा कमवणे
कधी थांबवायचे
आणि किती पैसा
आपल्याला पुरेल!

 ●  तुमच्याकडे
शेकडो हजारो
एकर सुपीक
शेतजमीन असली
तरी तुम्हाला
दररोज किती
अन्नधान्य लागते ?
तुमच्याकडे
अनेक घरे असली
तरी रात्री
झोपण्यासाठी
एक खोली
पुरेशी असते !

●  एक दिवस
आनंदा शिवाय
गेला तर
आयुष्यातला
एक दिवस तुम्ही
गमावला आहात
एक दिवस
आनंदात गेला तर
आयुष्यातला
एक दिवस तुम्ही
कमावला आहात
हे लक्षात असू द्या.

●   आणखी एक
गोष्ट तुमचा
स्वभाव खेळकर
उमदा असेल
तर तुम्ही
आजारातून
बरे व्हाल आणि
तुम्ही कायम
प्रफुल्लीत असाल
तर तुम्ही आजारी
पडणारच नाहीत .

●   सगळ्यात
महत्वाचे
म्हणजे
आजूबाजूला
जे जे उत्तम आहे
उदात्त आहे
त्याकडे पहा .
त्याची
जपणूक करा

●  आणि हो, तुमच्या
मित्रांना/मैत्रीणींना
कधीही
विसरु नका
त्यांना जपा .
हे जर तुम्हाला
जमले तर तुम्ही
मनाने कायम
तरुण रहाल
आणि इतरांनाही
हवेहवेसे वाटाल.

●  मित्र-मैत्रीण
नसतील तर
तुम्ही नक्कीच
एकटे आणि
एकाकी पडाल.

●   त्यासाठी रोज
व्हाट्सएपच्या
माध्यमातून
संपर्कात रहा
हसा, हसवत रहा
मुक्त दाद द्या
म्हणूनच म्हणतो
आयुष्य खुप
कमी आहे ते
आनंदाने जगा ...

●  प्रेम
मधुर आहे
त्याची
चव चाखा..!

●  क्रोध
घातक आहे
त्याला
गाडुन टाका..!

● संकटे ही
क्षणभंगुर
आहेत
त्यांचा
सामना करा..!

●  डोंगरा आड
गेलेला सूर्य
परत दिसू शकतो
पण ....

●  माथ्या आड
गेलेले "जिवलग"
परत कधीच
दिसत नाहीत ....

!! मित्र जपा
मैत्री जपा!!

*जमेल तसं जमतील तेव्हडे मात्र गेट टूगेदर करीत रहा!*
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

Tuesday, July 30, 2019

आईची तिजोरी

*आईची तिजोरी...!*

अण्णांचा पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम अण्णा आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त्यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शीलकी रहायची ती आई बचत करून ठेवायची...

घरात एक गोदरेज कपाट सार्वजनिक...! आई अण्णा.. आम्ही पाच भावंडे असे सगळे मिळुन सात जणांमध्ये ते बिचारं तीन बाय सहाच गोदरेजचं लोखंडी कपाट स्वतःहून समर्पित झालेलं असायचं आम्हाला... शिवाय काचही फुटलेली त्याची...! गेल्या 25 वर्षात त्याला परत काच लागली नाही...!

तो काळ ही तसाच होता... अण्णा शिक्षक... त्याकाळी पगार कितकासा राहणार? आजच्यासारखं वेतन आयोगामध्ये लोळणारे शिक्षक नव्हते ते! हल्लीचे शिक्षक गाड्या बंगल्याचे हप्ते भरतात! त्यावेळी समाजातला आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा होता शिक्षकी..!

घरखर्च, पाच जणांचं शिक्षण, कपडे, वह्या पुस्तकं, आजारपण ह्यातच त्यांची महिनाअखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची... झाकलेल्या पाटीसारखी अवस्था... एक कोंबडं झाकावं तर दुसरं आरवायचं! अशावेळी आईची मदत व्हायची...

म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते. घरात धनधान्याला बरकतता असते. अण्णांचा पगार वाटुन संपलेला असायचा तेंव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा; साचवलेल्या बचतीतून...!

कुणाचा हात पोहोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये  म्हणून घरातल्या घरात साचवून ठेवायची ती वेगवेगळ्या क्लुप्त्या करून...! आणि पैशांकडे हात आपोआप आकर्षित होत असणारा मी... नकळत डबोल मिळायचं मला तिचं.... _'कुणाला सांगणार नाही'_ म्हणून किरकोळ कमिशन घ्यायचो मी..! पण ते सर्व ती घरासाठीच करते हे त्या बाल-किशोर-तरुण वयातही समजायचं...!

एकदा टेपरेकॉर्डर चा external speaker box टराटरा आवाज काढायला लागला... कालपर्यंत चांगला वाजणारा बॉक्स असा काय वाजतोय म्हणुन वर चढून काढला दुरुस्तीला... घरातल्या घरात दुरुस्तीचे उपाय म्हणुन घेतला उघडायला... मागे कव्हरला वरून बोटभर गॅप होता त्याला...

चारही कोपऱ्यातले स्क्रू काढल्यावर कव्हर अलगद काढले नि आत मध्ये प्लॅस्टिक हिरव्या पिशवीत कसलीशी पुरचुंडी दिसली... गुंडाळलेली...!

पिशवी उघडली... त्यात शंभर... पन्नास... वीस... दहाच्या नोटा एकमेकांत गुंडाळुन मस्त आराम करत होत्या...! हजार पंधराशे सहज असतील... अल्लाउद्दीनचा खजाना लागला जसा हातात...!

आई बघत होती... म्हटली, _"आण इकडे...!"_ पन्नास रुपये कमिशन वर दिले परत अण्णांना न सांगण्याच्या बोलीवर...! नंतर त्याच पैशाचा घरातला पहिला सिलिंग दिल्ली मेड फॅन फिटिंग चार्ज सहित तीने बसवला... त्याआधी मुंडी इकडून तिकडं हलवणारा टेबलफॅन च असायचा..!

चाळीतलं घर म्हणजे एकेकाळी विडीउद्योगाचं ऑफिस होतं... स्वयंपाक घरात एका बाजूला कप्पेच कप्पे; एका वर एक कौलापर्यंत एकमेकांच्या बाजूला... भिंतीत बनवलेले... भिंतच जवळ जवळ दीड फूट जाडीची...!

जवळ जवळ वीसपंचविस कप्पे असतील...! स्वयंपाक घरातील सगळ्या वस्तू सहज बसायच्या त्यात... त्यातल्या एका वरच्या कप्यात सहा सात फुटावर पाहुणा गणपती ठेवलेला असायचा... म्हणजे गणपती वर्षभर जपून ठेवायचा..  पुढल्या गणपती सोबत बसवायचा आणि मागच्या वर्षाचा गणपती मग विसर्जित करून नवीन आणलेला गणपती पुढं वर्षभर ठेवायचा...! प्रथाच आहे ती घरातली...!

बोटांना परत वळवळ आली... म्हटलं धूळ साचलीय तर पुसून घ्यावा... वर चढलो... काढला तो गणपती... साफ करायला फडकं घेतलं... प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा खालून पोकळ असलेला गणपती तो... उलटा केला तर परत प्लॅस्टिकची पुरचुंडी...!

देवानं दान दिलं परत...! आईनं धपाटा टाकला... म्हटली _"कुठं कुठं हात पोहोचतात तुझे...!"_ कमिशन बेसिस वर परत मिळाले तीला...! पुढे डमरू सारखा नवीन टेपरेकॉर्डर घ्यायला तिनेच ते पैसे दिले होते..!

पुढे कधी कपाटाच्या पायांच्या खाचेत, ड्रॉवरच्या बाजूच्या जागेत... असे किती तरी वेळी सापडले...! कितीतरी वेळी तिने साचवलेल्या पैशातून घरच्या गरजा पूर्ण केल्या; जशा जमतील तशा...!

ना स्वतःसाठी काही दागिना केल्याचं आठवत, ना कधी साड्या. मेकप तर कधी आठवतही नाही तिनं केल्याचं!
साधी पावडर काय ती तेवढं लावतांना दिसायची... साधी, भोळी, भाबडी... साधं आयुष्य...!

वडिलांची मिळकत जेवढी त्यावर गुजराण करत जपलं सारं... हट्ट नाही की हेका नाही... परिस्थितीशी समझोता...

वडील रिटायर्ड झाल्यावर वडिलांनी हौसेनं केलेल्या बांगड्या बहिणीच्या लग्नात सरळ मोडायला देऊन टाकल्या...!

मुलगा झाला त्यावेळी मला अकरा हजार साचवलेले घेऊन आली द्यायला...!

वडील अंथरूणाला खिळले तेंव्हाही त्यांच्या दर महिन्याला काढलेल्या आणि साचवलेल्या पेन्शन मधूनच त्यांचे औषधपाणी, दवाखाना झाला... माझी मदत म्हणून किरकोळ..!

वडील गेले तेंव्हाही रितिरिवाजाप्रमाणे जेंव्हा घरातील डबे धुवायला घेतले... तेंव्हाही किती तरी डब्यात हजार पंधराशे सापडले पुरचुंड्या करून त्यावर आकडा लिहून ठेवलेल्या...!

तिला विचारलं तर भोळ्या मनानं म्हटली _"मलाच नाही माहीत...!"_

व्यावहारिक नव्हतीच ती कधी... अन जमलं ही नाही तिला कधी...! स्वतः ऍडमिट झाली तेंव्हाही तिचीच बचत कामी आली दवाखान्यासाठी... तिच्या उत्तर कार्यासाठी...! झळ नाही देऊन गेली जातांनाही...!

_'आई..._

_तुझ्या बचतीतले पैसे तुझ्या दवाखान्यासाठी खर्च होऊन शेवटचे उरलेलेे नऊशे रुपये तसेच ठेवलेत ग डब्यात तुझ्या...! दहा रुपयाचे खूप सारे कॉइनही तसेच राहू दिलेत लक्ष्मीपूजनाचे...! एका लक्ष्मीची एका गृहलक्ष्मीने केलेली पूजा खरच भोळी असायची...! श्रद्धा खूप तुझी... देवानं दिलंही सढळ सारं...! खूप हौशीने साजरी करायचीस तू लक्ष्मीपुजन...! डब्याला कुलुपही तसंच आहे... तू शिसपेन्सिलने लिहिलेले हिशोबाचे कागदही तसेच ठेवलेत तुझ्या डब्यात...! कमिशन नकोय ग मला...!'_

अक्काचा एक मित्र किरण खैरनार बोलता बोलता खखूप छान सांगून गेला; दारी आला होता तर... _"लिहा तुमच्या आठवणी लिहा... लिहिलं नाही तर पुढच्या पिढीला कसं समजणार की तुम्ही काय आणि कोण होतात ते...? कळू द्या पुढच्या पिढीला... वाचनाने जितकं समजतं तितकं सांगुन कमीच... म्हणून लिहा... कडू, गोड... लिहिण्यात चित्र उभं करा..."_

छान सुचवून गेला तो...!

आई, तू आजही हे लिहिताना
तू तशीच उभी राहिलीस समोर...!

Monday, July 8, 2019

निरागस बालपण

🍁  आम्ही ती शेवटची पिढी आहोत , मातीच्या घरात जन्मलो...

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,... वीज नसताना दिव्याच्या प्रकाशात वहीची पानं खट क्याच्या पेनांन गिरवली....

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,...शाळेतून वायरी च्या दप्तराच ओझ कोपऱ्यात टाकून शिळी भाकरी ,तेल चटणी खाल्ली..

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...मे च्या सुट्टीत रखरखत्या उन्हात  रानमेव्याचा आस्वाद घेत विहिरी पालथ्या घातल्या...

🍁 आम्ही ती शेवटची पिढी आहोत..ज्यांनी पावसाळ्यात छत्री, रेनकोट ऐवजी पोत्याची खोप घेतली.

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,..उन्हाळ्यात पळसाचं चप्पल,पावसाळ्यात चिखलाची जाड चप्पल. मिरवत निसर्गाचा आनंद लुटला..

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत...पावसाळ्यात थंडीचा पाऊस पडताना  आजीच्या उबदार गोधडीत वाघाच्या ,भुताच्या गोष्टी ऐकल्या...

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...गल्ली बोळात लपाछपी खेळतोय..

  🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...गोटि चा खेळ , MRF च बॅट नसताना बांबूच्या दांडक्याने क्रिकेट खेळलो...

🍁 आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,... Led- LCD , mobile नसताना सेल वरच्या रेडिओचा आनंद घेतला.

🍁आम्ही ती शेवटची  पिढी आहोत ,..जेव्हा सुझुकी, बुलेट.नव्हती ,
तर एक रुपयाला तासभर फिरणारी  भाड्याची सिंगल सीट सायकल होती..

🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...कॉइन बॉक्सवर 1रुपयात आपुलकीचं बोलण व्हायचं..

😔 कुठे तरी हरवलं ते व्यवहाराचा आणि भौतिकतेचा स्पर्श नसलेलं *निरागस बालपण* ..

🙏 आपल्या चिमुकल्यांना या भौतिक आणि यांत्रिक जगातून बाहेर खेचून आपल्या *पिढीने अनुभवलेले* ते *क्षण*  जरा कथन  करा .  क्षणभंगुर का होईना गतकाळात जायला मिळेल..
                      

Tuesday, June 18, 2019

गरुड की पोल्ट्रीची कोंबडी....?

*मुलांना काय घडवताय...?*
*गरुड की पोल्ट्रीची कोंबडी....?*
   
*माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले.....!*
मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले.
  पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला....!
एक दोन व्यवसायात अपयश आलेले,नोकरीतही तग धरत नाही
महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही.
 
*का झाले असावे असे.....?*
मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला...!
   *जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.....!*
   बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात,शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात.....!
   पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते,
  त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोआराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात.
   ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात,ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात,
   *पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात;*
   असे का,याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे....!
 
 *तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे....!*
   
*गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू,स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे,*
    *तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.*
 
आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात....!
पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३०/३५ हजारात गेला.मुलांना कॉन्व्हेंट शाळा,सकाळी बिस्किट,मॅगी,केक,स्कूल बस,घरी परत आल्यावर हातात जेवण,
पुस्तके व गाईड्स,क्लासेस,पॅरेंट मीटिंग,लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती,पालकही अभ्यास घेतात,मुलांना वार्षिक सहल,गृहपाठ,प्रोजेक्ट,
अजून बरंच काही.

मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात,
   
जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो,त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो.कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते.विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो.
     *तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते....!*
 
 आपला मुलगा म्हणजे खूप हुशार,हिरो,मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा,प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात.
   *परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो....!*

मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो,तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते.
१० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही.
उद्योग व व्यवसाय करावा,तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.
   
पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो.
   
*काय चुकले असेल या पालकांचे....?*
    *एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर मग मुलं अपयशी का....?*
    पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल घेवुन दिला,
त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला,

पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का...?.
 
कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली,
पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने,वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का...?
   
 जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते,
रोज समोर खाद्य टाकले जाते,पण त्या कोंबडीला हे माहित नसते,की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते,
ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे...! लागते,चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते.
ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही...!
    *याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत....!*
   *लहानपणी शाळेची पुस्तके जुनी,फाटलेली,मित्रांची किंवा भावाची वापरली.शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती,शाळेत जायला साधी सायकलही नव्हती.*
   *पाटी,दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे.जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची.*
    *आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची.*
   *केक,मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा..!*
   *गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे,नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची......!*
    *कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक.एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा,झाडाचा डिंक काढायचा,बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा.....!*
    *आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात....!*,
*ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?*
    *कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे....!*

शिकण्याची इच्छा असते,
इंजिनिअर व्हावे,
पुण्याला जावे,
मुंबईला जावे,
परदेशात जावे,

पण वडिलांनी साफ सांगितले,
आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही.

*आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका.१२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस,थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा...!*
    *अशी मुलं पुढे होतात गरुड...!*

 कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत.

ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते.
ज्यांना पालकांकडून फटक्यात पैसे मिळतात,
तो डोकं चालवायची तसदीच का घेईल?
शाळेत असताना ज्यांना घरची शेती,घरकाम,दुकानातील काम करावे लागते,त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते.गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते.

व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते.१२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात.

*अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात,त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते.*

*ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात.गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही,ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात...!*
 
*जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात....!*
 
 *पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो.*
  *जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते....!*

*तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात....!*
  *पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की...!*
 
*पोल्ट्रीची कोंबडी..?*
    *महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा....!*